सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 जिल्हा

सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत नियुक्ती, बदली आदेश जारी

डिजिटल पुणे    16-04-2026 11:20:47

सोलापूर : कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश आज जारी करण्यात आले.

कुलदीप जंगम हे 2018 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी सुरुवातीला अहमदाबाद ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी आयएएस सेवेत प्रवेश केला.

ऑक्टोबर 2020 ते जुलै 2022 या कालावधीत त्यांनी वाशिम येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून काम पाहिले. पुढे 2022 मध्ये त्यांनी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयात असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काही काळ सेवा दिली.

यानंतर ऑक्टोबर 2022 ते जून 2024 दरम्यान ते सिल्लोड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. अल्पावधीतच त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

प्रशासकीय कामकाजातील त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता आता त्यांची बदली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीकडे प्रशासकीय वर्तुळातून महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती