सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 विश्लेषण

नऱ्हेतील मानाजीनगरमध्ये वारंवार वीज खंडित; ऐन उन्हाळ्यात वीज खंडित झाल्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल

डिजिटल पुणे    17-04-2026 15:00:40

पुणे : पुणे शहरातील नऱ्हे परिसरातील मानाजीनगर येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. आठवड्यातून एक ते दोन वेळा दीर्घकाळ वीज खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आज (दि.) सकाळी सुमारे ९ वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असून तब्बल ६ ते ७ तास उलटूनही तो पूर्ववत झालेला नाही. संबंधित विभागाशी संपर्क साधला असता “एक तासात वीज येईल” असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात अनेक तास वीजपुरवठा सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मानाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी, नोकरदार वर्ग, रुग्णालयातील कर्मचारी, हॉटेल व्यावसायिक तसेच छोटे-मोठे उद्योगधंदे करणारे नागरिक राहतात. वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.

या समस्येमुळे व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून रुग्णसेवेलाही अडथळे निर्माण होत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वारंवार एकाच भागा मधे गेली वर्षभर सतत वीज खंडित होत आहे .प्रशासना कडून तात्पुरती दुरस्ती केली जाते पण कायम स्वरूपी उपाय योजना केली जात नाही .तरी प्रशासनाने कायम स्वरूपी उपसा योजना करावी अशा येंथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत

“वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

#electricitycut #electricitysupply #msebpune #narhe #msebpower


 Give Feedback



 जाहिराती