सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 जिल्हा

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात डॉ. जितेंद्र शेळके दाम्पत्याचा मृत्यू; पोलिसांकडून प्राथमिक कारण स्पष्ट

डिजिटल पुणे    17-04-2026 18:47:20

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर झालेल्या गंभीर अपघातात नाशिकमधील व्यावसायिक डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर विविध स्तरांतून घातपाताच्या चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी प्राथमिक तपासातून महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी डॉ. शेळके स्वतः वाहन चालवत होते. प्रवासादरम्यान त्यांना झोपेचा झटका (डुलकी) लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आणि शेळके दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना कोपरगाव-वैजापूर दरम्यान घडली. शेळके कुटुंब श्री क्षेत्र माहूर येथे दर्शन करून शिर्डीकडे परतत होते. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत.

डॉ. जितेंद्र शेळके (वय ५०) हे शिर्डी परिसरात रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय होते. ‘सिल्व्हर ओक डेव्हलपर्स’ या नावाने त्यांचा व्यवसाय असून, शिक्षण क्षेत्रातही त्यांनी काम केले होते. ते काही सामाजिक व धार्मिक संस्थांशीही जोडलेले होते.दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस विविध अंगांनी चौकशी करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती