सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
 विश्लेषण

मोठी बातमी! आज रात्री 8.30 वाजता पंतप्रधानांचे राष्ट्राला संबोधन; महिला आरक्षणावर मोठी भूमिका जाहीर होण्याची शक्यता

डिजिटल पुणे    18-04-2026 15:08:25

मुंबई : संसदेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सरकारला धक्का बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. या भाषणात ते या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभेत 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक असलेलं दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं. मतदानात 298 मते विधेयकाच्या बाजूने, तर 230 मते विरोधात पडली. एकूण 528 खासदारांनी मतदानात सहभाग घेतला होता. मंजुरीसाठी लागणारी अतिरिक्त मते न मिळाल्याने विधेयक नामंजूर झालं.

या पार्श्वभूमीवर झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केल्याची माहिती समोर आली आहे. महिला आरक्षणाला अडथळा आणून विरोधकांनी महिलांच्या हक्कांनाच विरोध केल्याचा आरोप त्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. हा मुद्दा देशभर पोहोचवण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं, अशी चर्चा आहे.

दरम्यान, या विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा राजकीय डाव रचला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.आजच्या संबोधनात पंतप्रधान नेमकी कोणती घोषणा करतात, सरकारची पुढची रणनीती काय असेल आणि विरोधकांवर ते किती आक्रमक भूमिका घेतात, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती