सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 जिल्हा

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    20-04-2026 10:36:19

नागपूर  : जगातील सर्व संस्कृती जास्तीत जास्त ४ हजार वर्षे जुन्या आहेत, मात्र आधुनिक पद्धतीने काढलेले वेदांचे वय हे १२ हजार वर्षाहून अधिक आहे. जगातील सर्वात प्राचीन साहित्य असलेले वेद समृद्ध जीवन पद्धती सांगणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घोगली येथे निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर (एनजेटी) वेद पाठशाळेचे उद्घाटन आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोविंद देव गिरी महाराज उपस्थित होते.आपली प्राचीन परंपरा पुढे नेण्यासाठी सुरू करण्यात आलेला वेद पाठशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्ञान विज्ञानाचा आधार वेदच आहेत. सनातन धर्म संपूर्ण मानव जातीचे कल्याण सांगतो. हिंदू जीवन ही जगातील आदर्श पद्धती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.वेद हेच आपले मूळ धन असल्याचे सांगून गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा पायाच वेद आहे. जगातील सर्व संस्कृती आणि भाषांचा जन्म वेदांनंतर झाला आहे. वेद हे केवळ हिंदूंसाठी नाही तर मानव जातीच्या कल्याणासाठी असल्याचे गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.प्रारंभी रोहन ठाकर यांनी प्रास्ताविक केले. आचार्य सागर शर्मा, नरेंद्र झा प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती