सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 जिल्हा

कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

डिजिटल पुणे    21-04-2026 10:58:58

मुंबई  :- कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल. फिश मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.मंत्रालयात मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या  बैठकीस आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केट दर्जेदार व्हावे यासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी उपलब्ध करुन घ्यावा. या मार्केटसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडील अन्य योजनांचाही लाभ मिळवून दिला जाईल.प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, कोल्ड स्टोरेज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांना नियोजित बाजारपेठ मिळणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीनंतर गिरगाव चौपाटी येथे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या कोळी बांधवांच्या समस्यांचा सकारात्मक विचार करून  यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत पारंपरिक मच्छीमाराला मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे  मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती