सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 शहर

सनसिटी ते शिवाजीनगर नवीन PMPML बससेवेचे उद्घाटन; प्रवाशांना दिलासा

गजानन मेनकुदळे    21-04-2026 12:00:58

पुणे : सनसिटी परिसरातील नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ‘सनसिटी ते शिवाजीनगर’ या नवीन PMPML बससेवेचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटन सोहळा PMPML चे अध्यक्ष मा. अजयजी खेडेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, नगरसेविका सौ. ज्योतीताई गोसावी, नगरसेवक सचिन मोरे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही या नव्या बससेवेचे उत्साहात स्वागत केले.

 

 

 

ही बस सनसिटी येथून सुटून दांडेकर पूल, नळस्टॉप आणि एफ.सी. रोड मार्गे शिवाजीनगरपर्यंत धावणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांना शहरातील महत्त्वाच्या भागांशी थेट जोड मिळणार असून, रोजच्या प्रवासात लागणारा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “ही बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. आज ती पूर्ण झाल्याचा आनंद आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात शहरातील इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या बससेवा सुरू करून PMPML चा विस्तार करण्याचा मानस आहे.

 

 

स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. “आतापर्यंत आम्हाला शिवाजीनगरपर्यंत जाण्यासाठी अनेक वेळा बस बदलावी लागत होती. आता थेट बस उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.एकूणच, सनसिटी ते शिवाजीनगर ही नवीन बससेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय निर्माण होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती