सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 शहर

बिबवेवाडी परिसरात दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार अटक; पोलिसांची कारवाई

डिजिटल पुणे    22-04-2026 10:35:32

पुणे : बिबवेवाडी पोलिसांनी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करत मोठी कारवाई केली आहे. संबंधित आरोपी तडीपार असतानाही पुन्हा पुण्यात येऊन गुन्हेगारी कृत्ये करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र आदेशाचे उल्लंघन करून तो बिबवेवाडी परिसरात वावरत होता. या दरम्यान तो हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात फिरत दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटकेदरम्यान त्याच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती