सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 क्राईम

चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; छातीत दुखू लागल्याने कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली

डिजिटल पुणे    22-04-2026 10:43:47

नाशिक : भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याची एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातची मंगळवारी चौकशी सुरू असतानाच तब्येत खालावली.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान खरात याला अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर छातीत वेदना सुरू झाल्याने पोलिसांनी तातडीने ऑक्सिजनची व्यवस्था केली. परिस्थिती गंभीर वाटल्याने कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खरातच्या वकिलांनी न्यायालयात त्याच्या आरोग्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतरही त्रास सुरू असल्याचे सांगत न्यूरोसर्जनकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच प्रकृती बिघडल्याने विविध तर्कांना उधाण आले आहे.

हॉटेल व्यावसायिकाची चौकशी

या प्रकरणाच्या तपासाचा विस्तार करत एसआयटीने नाशिकमधील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाचीही सुमारे सहा तास चौकशी केल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी-विक्री आणि अन्य संबंधांबाबत त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. चौकशीनंतर संबंधित व्यावसायिकाला सोडण्यात आले.खरात याची पोलीस कोठडी गुरुवारी संपत असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील सुनावणीत एसआयटीकडून कोणती नवी माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूरातून फसवणुकीची तक्रार

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानेही खरातविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. 11 एकर जमीन खरेदीच्या व्यवहारात पूर्ण रक्कम न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उर्वरित पैसे मागितल्यास जादूटोण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती