सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 शहर

आप्पा बळवंत चौकात बसचा अपघात; ‘पीएमपीएमएल’ बस दुकानात घुसली, सुदैवाने जीवितहानी टळली

डिजिटल पुणे    22-04-2026 11:50:41

पुणे : पुणे शहरातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौक (एबीसी) परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) एक बस नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या दुकानात जाऊन धडकली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

माहितीनुसार, सकाळच्या वर्दळीच्या वेळेत ही बस वेगात जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. बसने मार्ग बदलत थेट दुकानाच्या दर्शनी भागावर जोरदार धडक दिली. या अपघातात दुकानातील काचा, फर्निचर आणि विक्रीसाठी ठेवलेला माल मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला.

घटनेच्या वेळी दुकानासमोर किंवा आत नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित दुकानदाराने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, बस चालकाने प्राथमिक चौकशीत ब्रेक निकामी झाल्यामुळे वाहनावर नियंत्रण राहिले नसल्याचा दावा केला आहे. तथापि, अपघाताचे नेमके कारण तांत्रिक बिघाड होते की मानवी चूक, याचा तपास सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.


 Give Feedback



 जाहिराती