सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 जिल्हा

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

डिजिटल पुणे    22-04-2026 17:28:45

मुंबई -  जे. एन. पी. ए. मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा (ता. उरण जि. रायगड) गावातील मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार महेश बालदी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा गावातील मच्छीमार यांना नुकसान भरपाई देण्यासाठी याचे वर्गीकरण करून त्याबाबतचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

गस्ती नौका, ड्रोन खरेदीचा आढावा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका व ड्रोन खरेदी बाबतचा आढावा  घेतला. गस्ती नौका व ड्रोन खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती