पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोणावळा–कुसगाव दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामासाठी गुरुवारी (२३ एप्रिल) दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी (२४ एप्रिल) पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूकही ठराविक वेळेसाठी बंद राहणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत सर्व वाहने कुसगाव टोल नाक्याजवळून जुन्या मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.या कामामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता असून, प्रवाशांनी संयम बाळगावा, असेही सांगण्यात आले आहे.