सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 शहर

कात्रज–कोंढवा रस्त्याच्या मार्गी मोकळा; भूसंपादनास राज्याकडून अखेर मंजुरी

डिजिटल पुणे    23-04-2026 16:33:43

पुणे : कात्रज–कोंढवा परिसरातील बहुप्रतिक्षित रस्ता प्रकल्प अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने मोठी पायरी पार झाली आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्याने पुणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता गती घेणार आहे.

सुमारे ८४ हजार ४५७ चौरस मीटर जागेच्या भूसंपादनासाठी शासनाने हिरवा कंदील दिला असून, त्यासाठी सुमारे २७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने यापूर्वीच या प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कात्रज–कोंढवा रस्ता सध्या अरुंद असल्याने येथील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

या प्रकल्पामुळे स्थानिकांना सुकर वाहतूक, कमी वेळेत प्रवास आणि परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. विशेषतः कोंढवा, कात्रज आणि आसपासच्या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.महापालिकेकडून लवकरच प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार असून, त्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती