सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 शहर

‘कृष्ण रंग’ या सांगीतिक कार्यक्रमाचे २ मे रोजी आयोजन

डिजिटल पुणे    27-04-2026 10:56:59

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित  ‘कृष्ण रंग’ हा भगवान श्रीकृष्णावर आधारित विविध बंदिशी आणि रचनांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि.२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका  डॉ. रेवा नातू यांच्या शिष्यवर्गातील कलाकार सहभागी होणार आहेत. यात मृणाल धोंगडे, सायली भाटे, कृतिका महाशब्दे, अनुजा वारे - महाजन, मल्हार पटवर्धन, शिवानी पेठकर, अनुश्री मुजुमदार, सई क्षीरसागर, आसावरी बापट, सागर सांभारे (हार्मोनियम), अनिकेत पंडित (तबला) आणि श्रावणी बिनिवाले (निवेदन) यांचा समावेश आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २८९ वा कार्यक्रम आहे. प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली .


 Give Feedback



 जाहिराती