सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 DIGITAL PUNE NEWS

शिवरायांच्या चरणी रितेश-जेनेलिया जोडीने नतमस्तक;ढोल-ताशांच्या गजरात ‘राजा शिवाजी'च्या प्रदर्शनापूर्वी भिवंडीत जल्लोष

डिजिटल पुणे    27-04-2026 17:49:56

मुंबई : ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पारंपरिक पद्धतीने आरती करत त्यांनी शिवरायांचे आशीर्वाद घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली.

ठाणे जिल्ह्यातील मराडेपाडा येथील या पवित्र स्थळी त्यांच्या आगमनाने भक्तिमय वातावरणासोबतच उत्साहाची लाट उसळली. स्टार जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी स्थानिक नागरिक, महिला आणि युवकांनी मोठी गर्दी केली होती.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे स्थित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) या पवित्र स्थळी त्यांच्या आगमनाने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा भव्य सिनेमॅटिक प्रवास आहेहा बहुप्रतिक्षित चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे प्रदर्शन अधिक विशेष मानले जात आहे

ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. पारंपरिक वाद्यांच्या तालावर वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे रोजी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असून शिवरायांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा भव्य सिनेमॅटिक प्रवास असल्याचे सांगितले जात आहे.

 महाराष्ट्राच्या लाडक्या स्टार जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आलीढोल-ताशांच्या गजराने मंदिर परिसरात ऊर्जा आणि उत्साहाची लाट पसरली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर वातावरण भारावून गेले आणि उपस्थित प्रत्येकासाठी हा क्षण संस्मरणीय ठरला.‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा भव्य सिनेमॅटिक प्रवास आहे.


 Give Feedback



 जाहिराती