सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 शहर

१ मे रोजी नानासाहेब गोरे अभिवादन सभेचे आयोजन

डिजिटल पुणे    29-04-2026 14:18:08

पुणे : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन व एस. एम. जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता  एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन,नवी पेठ येथील सभागृहात  आयोजित करण्यात आली आहे.या सभेचा मुख्य विषय ‘समाजवादी चळवळीचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ असा असून, या विषयावर  मार्गदर्शन करण्यासाठी म. फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष  अॅड. मोहन वाडेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष  सुभाष वारे हे असणार  आहेत. 

समाजवादी चळवळीच्या इतिहासाला उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास समाजवादी विचारसरणीशी निगडित कार्यकर्ते, अभ्यासक, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती