सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन; 'ऑपरेशन टायगर'नंतर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे आमनेसामने, शक्तिप्रदर्शनाकडे राज्याचे लक्ष
  • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी तब्बल 18 हजार रुपयांनी स्वस्त
  • तुळजापूरमध्ये 200 आणि 500 रुपये भरून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांचं स्वतंत्र दर्शन बंद; सर्व भाविकांना समान अंतरावरून दर्शन
 DIGITAL PUNE NEWS

अमृता फडणवीसांचं ‘नमन तुला’ गाणं चर्चेत; अनु मलिक यांचं संगीत, महाराष्ट्र दिनी होणार रिलीज

डिजिटल पुणे    29-04-2026 15:07:09

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. ‘नमन तुला’ असं शीर्षक असलेल्या या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

छत्रपती शिवरायांना अभिवादन करणाऱ्या या गाण्याची खास गोष्ट म्हणजे याला बॉलीवूडचे दिग्गज संगीतकार  अनु मलिक यांनी संगीत दिलं आहे. तसेच हे गाणं  टी सिरीज या नामांकित संगीत कंपनीमार्फत सादर करण्यात येत आहे. गाण्याच्या निर्मितीत इतर काही कलाकारांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत येत्या महाराष्ट्र दिन (1 मे) रोजी ‘नमन तुला’ हे गाणं अधिकृतपणे रिलीज होणार आहे. सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित चित्रपटांची चर्चा रंगली असताना, त्याच पार्श्वभूमीवर हे गाणं प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.

दरम्यान, 2026 मध्ये अमृता फडणवीस यांनी विविध प्रकारची गाणी सादर केली आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी ‘शंभु रे’ हे भक्तीगीत रिलीज केलं होतं, तर ‘किसी की मुस्कुराहटो पे’ या गाण्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. बँकिंग क्षेत्रात काम करत असताना त्यांनी संगीताची आवड जोपासली आणि आता त्या पूर्णवेळ गायन क्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती