पुणे : पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आयोजित 'भारतीय विद्यापीठ संघाची' संघाच्या' (AIU) १०० व्या वार्षिक महासभेच्या आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचा दुसरा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” या संकल्पनेवर आधारित आजच्या सत्रांमध्ये शाश्वत विकास, उद्योजकता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान आणि भारतीय पारंपरिक ज्ञान या विषयांवर देशभरातील कुलगुरू आणि तज्ज्ञांनी विचार मांडले.
डॉ. पी. डी. पाटील, (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) म्हणाले की, "उच्च शिक्षणाची व्याप्ती आता केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित राहिलेली नाही. विद्यार्थ्यांना नैतिकदृष्ट्या सक्षम, सामाजिकदृष्ट्या जागरूक आणि जबाबदार नागरिक बनवणे ही विद्यापीठांची मोठी जबाबदारी आहे. परंपरा आणि आधुनिक प्रगतीचा समतोल राखूनच आपण देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो."
डॉ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) म्हणाल्या की, ""या परिषदेतील चर्चेतून आपल्याला याची जाणीव होते की, उच्च शिक्षणाचे भविष्य केवळ पुस्तकी ज्ञानावर उभे राहू शकत नाही. ते सखोल विचार करण्याची क्षमता, जबाबदार कृती आणि समाजाची सेवा करण्याच्या उद्देशावर आधारलेले असले पाहिजे. कौशल्यपूर्ण, मूल्यांशी जोडलेले आणि बदलत्या राष्ट्राच्या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी सज्ज अशा तरुणांना घडवण्याची ताकद विद्यापीठांमध्ये आहे. त्यापुढे म्हणाल्या भारत जेव्हा 'विकसित भारत २०४७' च्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा आपल्या शिक्षण संस्था अशा जागा बनल्या पाहिजेत जिथे नवोपक्रमाला (Innovation) प्रोत्साहन मिळेल, संशोधन अधिक मजबूत होईल आणि शिक्षण नेहमीच माणुसकीशी जोडलेले राहील. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे यांच्यासाठी या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवणे, हा एक सन्मान तर आहेच, पण त्याचसोबत भारतीय उच्च शिक्षणाच्या उज्वल भविष्यासाठी असलेली एक मोठी जबाबदारीही आहे.
दिवसभरातील प्रमुख सत्रे:
स्थापना दिन व्याख्यान: दिवसाची सुरुवात माजी राज्यसभा सदस्य; उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी.डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी विद्यापीठांना केवळ रोजगारासाठी नव्हे, तर राष्ट्र उभारणीचे केंद्र बनण्याचे आवाहन केले.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. बालमुरुगन डी. (IAS) आणि उपसंचालक डॉ. नवदीप सिंग सुहाग यांनी या योजनेची माहिती दिली. याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव (Workplace Exposure) कसा मिळेल, यावर चर्चा करण्यात आली.
शाश्वत विकास आणि सामाजिक जबाबदारी: या सत्रात विद्यापीठांचे कॅम्पस शाश्वत आणि पर्यावरणपूरक कसे बनवता येतील, यावर प्रो. बी. आर. कंबोज (कुलगुरू, चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिसार, हरियाणा) यांच्या अध्यक्षतेखाली प्रो. विमला वाय. (कुलगुरू, माँ शाकुंभरी विद्यापीठ, सहारनपूर), प्रो. सी. मुथमिझचेलवन (कुलगुरू, एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चेन्नई) आणि प्रो. बी. के. रवी (कुलगुरू, बेंगळुरू उत्तर विद्यापीठ, कर्नाटक).या वक्त्यांनी विद्यापीठांनी शाश्वत कॅम्पसची उभारणी करणे, सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक-पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेणे. या विषयावर विचार मंथन केले.
उद्योजकता आणि स्टार्टअप्स: कुलगुरूंनी विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना 'इन्क्युबेशन' आणि 'मेंटरशिप'च्या माध्यमातून स्टार्टअपमध्ये कसे रूपांतरित करता येईल, यावर भर दिला. प्रा. (डॉ.) गौतम सूत्रधार, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जमशेदपूर, झारखंड यांच्या अध्यक्षतेखाली विचार मंथन झाले. डॉ. टेसी थॉमस (कुलगुरू, नुरुल इस्लाम सेंटर फॉर हायर एज्युकेशन, तामिळनाडू), डॉ. निर्मलजीत सिंग कलसी (IAS निवृत्त, माजी अध्यक्ष, नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, नवी दिल्ली) आणि प्रो. डॉ. राजीव सूद (कुलगुरू, बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, फरीदकोट). यांनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याबाबत भूमिका मांडली.
एआय (AI) आणि क्वांटम तंत्रज्ञान: प्रो. एच. सुदर्शन राव (कुलगुरू, जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठ, अनंतपूर) अध्यक्षतेखाली गुगल फॉर एज्युकेशनचे भारत प्रमुख संजय जैन आणि इतर तज्ज्ञांनी भविष्यातील डिजिटल बदलांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला. प्रो. विनीत कंसल (संचालक, आयआयआयटी, पुणे), प्रो. डॉ. प्रफुलकुमार उदाणी (कुलगुरू, सांकलचंद पटेल विद्यापीठ, गुजरात), श्री. सृजन पाल सिंग (संस्थापक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटर, नवी दिल्ली) याविषयावर सादरीकरण केले.
पारंपरिक ज्ञान प्रणाली: भारतीय पारंपरिक ज्ञानाचा (आरोग्य, पर्यावरण आणि जीवनशैली) आधुनिक अभ्यासक्रम आणि संशोधनात समावेश करण्यावर प्रा. सत प्रकाश बन्सल, कुलगुरू, केंद्रीय विद्यापीठ, हिमाचल प्रदेश (धर्मशाला) यांच्या अध्यक्षतेखालील सत्रात सविस्तर चर्चा झाली. सीनियर प्रो. कुमार मोलुगरम (कुलगुरू, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद), प्रो. शशिकला वंजारी (कुलगुरू, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली) आणि प्रो. श्रीनिवास वरखेडी (कुलगुरू, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली) यांनी आपले विचार मांडले
भागीदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी संवाद: दुपारच्या सत्रात डी-एक्झिट ग्लोबल (DEXIT GLOBAL), फिलिप्स, एल्सेव्हियर यांसारख्या विविध शैक्षणिक आणि आरोग्य तंत्रज्ञान कंपन्यांशी संवाद साधण्यात आला.उद्या परिषदेच्या अंतिम दिवशी 'विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, २०२५' वर खुली चर्चा होईल आणि त्यानंतर समारोप सत्राने या ऐतिहासिक परिषदेची सांगता होईल.या सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, तर शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अतुल कोठारी हे सन्माननीय अतिथी असतील.