सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 राजकारण

पवार घराण्यात ‘पवार विरुद्ध पवार’ लढत होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका

डिजिटल पुणे    30-04-2026 13:09:08

बारामती:  बारामती पोटनिवडणुकीनंतर 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगू शकतो, अशा चर्चांना उधाण आले असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर ठाम भूमिका मांडली आहे. “मी कधीही पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ देणार नाही. स्वतःही कोणत्याही पवारांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडेच जय पवार यांनी 2029 मध्ये उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे म्हटले होते. यावर आमदार रोहित पवार यांनी बारामतीत भावनिक निर्णय घेत सुनेत्रा पवार यांचा प्रचार केल्याचे सांगत, भविष्यात पुन्हा पवार घराण्यातील लढत होण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सुळे यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.सुळे म्हणाल्या की, “2029 मध्ये काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. आघाड्या, समीकरणे त्या वेळेला ठरतील. मात्र पवार कुटुंबात अंतर्गत लढत टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.”

महाविकास आघाडीत संवाद कायम

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काही मतभेद दिसत असले तरी संवाद सुरू असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. “आम्ही राजकारणात आहोत, एनजीओ चालवत नाही. मतभेद असले तरी चर्चा करून निर्णय घेतो,” असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना, “अजून अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संवाद चांगला आहे,” असे सांगितले. तसेच राहुल गांधी आणि  संजय राऊत यांच्यातील समन्वय आणि गांधी-ठाकरे कुटुंबीयांतील संबंधही उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.एकंदरीत, बारामतीतील राजकीय समीकरणांवर सुळे यांच्या विधानामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती