सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 शहर

धायरी परिसरात आज आधार कार्ड शिबिराचे आयोजन; विविध अपडेट सुविधा एकाच ठिकाणी

डिजिटल पुणे    02-05-2026 11:52:18

पुणे : नागरिकांना आधारसंबंधित सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी धायरी परिसरात विशेष आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक श्री बाळासाहेब नवले आणि नगरसेविका सौ. कोमल सारंग नवले यांच्या पुढाकारातून हे सहावे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

आज शनिवार, २ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर नगरसेविका कोमलताई सारंग नवले जनसंपर्क कार्यालय, एक्सिस बँक समोरील लेन, धायरी फाटा, वडगाव खुर्द येथे पार पडणार आहे.

या शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणी, मोबाईल नंबर लिंक करणे, नाव, जन्मतारीख व पत्त्यातील दुरुस्ती तसेच केवायसी अपडेट करण्याच्या सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे, सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे.

शिबिरासाठी येताना नागरिकांनी ओळख पुरावा, पत्ता पुरावा आणि जन्मतारीख पुरावा यापैकी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी जन्म प्रमाणपत्र आणि पालकांचे आधार कार्ड बंधनकारक राहणार आहे.

या सेवांसाठी शासनाने निश्चित केलेली फी लागू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी 9358791010 किंवा 9304101010 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तरी धायरी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती