सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डिजिटल पुणे    02-05-2026 12:50:13

ठाणे : ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या डबलडेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.जी.सी.सी तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबलडेकर बसमध्ये एकाचवेळी 65 प्रवासी बसू शकतात तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करु शकतील. सद्यस्थितीत ही बस तीन हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती