सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 क्राईम

भोरमध्ये चिमुरडीवरील अत्याचारानंतर संताप उसळला; “सुरक्षा नसेल तर योजनांचा काय उपयोग?” महिलांचा सरकारला सवाल

डिजिटल पुणे    02-05-2026 16:33:12

पुणे  : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका संतापजनक घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या या चिमुरडीसोबत घडलेल्या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. संशयिताने तिला फूस लावून जवळच्या गोठ्यात नेल्याचा आरोप असून, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणानंतर ग्रामस्थांनी तत्काळ संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, आरोपीने आरोप फेटाळल्याने संताप अधिकच वाढला आहे. घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.

विशेषतः महिलांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आमची सुरक्षितता सुनिश्चित होत नसेल, तर आर्थिक योजनांचा काय उपयोग?” असा सवाल उपस्थित केला. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती