सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 क्राईम

नसरापूर प्रकरण: सुनेत्रा पवार यांची पीडित कुटुंबाला भेट; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून फास्ट ट्रॅक सुनावणीचे आश्वासन

डिजिटल पुणे    02-05-2026 16:47:33

पुणे: नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या हत्येच्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची पुण्यात भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

घटनास्थळी उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवर संपर्क साधून जनतेच्या भावना कळवल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच, संपूर्ण तपास आणि न्यायप्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती