सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 जिल्हा

‘एलआयटी’ जगाला उत्तम अभियंते देईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    04-05-2026 14:19:39

 नागपूर : आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या ‘एलआयटी’चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम अभियंते देण्याचे काम लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (एलआयटी) विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

काही वर्षांपूर्वी या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यामुळे दर्जा तर वाढलाच परंतु, आता येथे भव्य व सुंदर शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून या विद्यापीठाची ओळख असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दीप प्रज्वलनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिपूजन केले. कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) या संस्थेला मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाचा दर्जा दिला त्यानंतर या संस्थेचे नाव लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ झाल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. सौरभ जोगळेकर यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी आभार मानले. आमदार विकास ठाकरे, आमदार कृपाल तुमाने, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गणपती यादव, प्रमुख सल्लागार मोहन पांडे प्रभृती यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती