सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 DIGITAL PUNE NEWS

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रातील प्रस्तावित हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा

डिजिटल पुणे    05-05-2026 11:52:44

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा आज  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणे, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणे या उद्देशाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागपूर-भंडारा टप्प्याचे सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर टप्प्याचे चार पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडॉर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडॉर, नागपूर-हैदराबाद कॉरिडॉर, भंडारा-रायपूर टप्प्याचे सहा पदरीकरण, लखनादोन-दुर्ग-रायपूर कॉरिडॉर, नागपूर-अमरावती टप्प्याचे सहा पदरीकरण, एनएच-44 वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा-नागपूर बायपास-बोरखेडी टप्प्याचे तसेच पुणे-सातारा टप्प्याचे सहा पदरीकरण या प्रकल्पांचा समावेश होता.

या बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण 527 किमी लांबीच्या नऊ बीओटी प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला. यात शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर-वडाळा, वडाळा-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जालना-वातूर, नांदेड-नरसी-देगलूर, जाम-वरोरा, वरोरा-चंद्रपूर-बामणी आणि मलकापूर-चिखली या कॉरिडॉरचा समावेश आहे.


 Give Feedback



 जाहिराती