पुणे:पुण्यातील संविधान चौकात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंच भव्य ध्वजस्तंभाचे लोकार्पण गुरुवार, ७ मे २०२६ रोजी होणार आहे. माजी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात हा ध्वजस्तंभ उभारला असून, या उपक्रमात त्यांच्या मातोश्री सौ. रत्नप्रभाताई जगताप यांचाही सहभाग आहे.वानवडी साळुंखे विहार प्रभागातील संविधान चौक येथे मी व माझ्या मातोश्री सौ. रत्नप्रभाताई जगताप यांनी नगरसेवक पदाच्या मागील कार्यकाळात उभारलेल्या ४५ मीटर उंच भव्य ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा दिनांक ७ मे २०२६ रोजी संपन्न होत आहे.
या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रमुख उपस्थित राहणार असून, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.संविधान चौकातील हा उंच ध्वजस्तंभ शहराच्या अभिमानात भर घालणारा ठरणार असून, देशभक्तीची भावना जागृत करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे.या अभिमानास्पद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती !