सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 क्राईम

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर रक्तरंजित संघर्ष; शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या

डिजिटल पुणे    07-05-2026 11:16:04

पश्चिम बंगाल  : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक ठिकाणी हिंसक संघर्ष उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरातील डोहरिया येथे बुधवारी रात्री हा थरारक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ वाहनातून घरी जात असताना चंदेरी रंगाच्या कारमधून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर आरोपींनी जवळून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात रथ यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा सुरक्षारक्षकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रनाथ रथ हे गेल्या पाच वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या हत्येमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, हल्लेखोरांनी रथ यांच्या वाहनाचा पाठलाग करत तब्बल 12 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती