सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! शहरातील 13 बोगस शाळांची यादी जाहीर; पालकांनी प्रवेशापूर्वी मान्यता तपासा
  • इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या, मुद्देमाल हस्तगत
  • मोठी बातमी : केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्याही उमेदवार : जय पवार
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
 DIGITAL PUNE NEWS

स्वामींच्या साक्षीने अक्कलकोटमध्ये ‘देऊळ बंद 2’चा टिझर लॉन्च; स्नेहल तरडे भावूक

डिजिटल पुणे    07-05-2026 17:25:08

अक्कलकोट : बहुचर्चित मराठी चित्रपट देऊळ बंद 2 चा टिझर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आला. स्वामी समर्थांच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने स्वामीभक्त आणि चित्रपटप्रेमींनी उपस्थिती लावली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमने चाहत्यांसोबत टिझर लॉन्चचा आनंद साजरा केला.

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तब्बल 11 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री स्नेहल तरडे या चित्रपटाबद्दल बोलताना भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट त्या महिलांना समर्पित आहे ज्या आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर संघर्ष करतात, कष्ट सहन करतात आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता परिवारासाठी झटत राहतात. स्वामी समर्थांच्या कृपेने हा चित्रपट करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. बोलताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटात एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा दाखवण्यात येणार आहे. पहिल्या भागात स्वामी समर्थांचा प्रवास एका परदेशी शास्त्रज्ञाच्या आलिशान कारमधून दाखवण्यात आला होता, तर यावेळी स्वामी एका गरीब महिलेच्या साध्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत.हा चित्रपट 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, टिझर लॉन्चनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.


 Give Feedback



 जाहिराती