पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक गेल्या काही दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा करत होते. बारावीनंतर आता दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विषयानुसार गुण पाहता येणार असून अधिकृत गुणपत्रिका संबंधित शाळेतून मिळणार आहे. पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण विभागातील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?
विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतात :
sscresult.mahahsscboard.in
results.targetpublications.org
DigiLocker Results
महाशिक्षण मंडळ अधिकृत संकेतस्थळ
results.navneet.com
ऑनलाईन निकाल कसा पाहाल?
कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जा
‘SSC Examination March 2026 Result’ लिंकवर क्लिक करा
सीट नंबर टाका
आईचे पहिले नाव इंग्रजीत भरा
‘View Result’ बटणावर क्लिक करा
स्क्रीनवर निकाल दिसेल
मोबाईलवर SMS द्वारे निकाल कसा मिळवणार?
इंटरनेट स्लो असल्यास विद्यार्थी SMS सेवेद्वारेही निकाल मिळवू शकतात.
मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये: MHSSC <Seat Number>
असा मेसेज टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवावा. काही वेळात निकाल मोबाईलवर प्राप्त होईल.
DigiLocker वरून गुणपत्रिका डाउनलोड
विद्यार्थ्यांना DigiLocker वरूनही डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करता येणार आहे.
वेबसाईट बंद असल्यास ‘हे’ पर्याय वापरा
अधिकृत वेबसाईटवर ताण वाढल्यास विद्यार्थी खालील पर्यायी वेबसाईटचा वापर करू शकतात :
sscresult.mkcl.org
results.targetpublications.org
निकालाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा कराल?
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक राहील.
विद्यार्थ्यांनी महाशिक्षण मंडळ संकेतस्थळ वरून स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करायचा आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कामकाजाच्या दिवसांत विहित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे.