पुणे : केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्यनगरीचे खासदार आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाल्यानंतर हरिदास चरवड यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मोहोळ यांनी लवकरात लवकर पूर्णपणे निरोगी व्हावे आणि पूर्वीप्रमाणे जनसेवेत सक्रिय राहावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
हरिदास चरवड यांनी सांगितले की, मुरलीधर मोहोळ यांचे नेतृत्व, कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असून समाजकारण आणि जनसेवेमधील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.या सदिच्छा भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि संघटनात्मक विषयांवरही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.