सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 जिल्हा

द्रोणागिरी (उरण) मध्ये १७ मे रोजी 'विराट हिंदू संमेलना'चे आयोजन

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    13-05-2026 17:45:46

उरण ;सकल हिंदू समाज, द्रोणागिरी (उरण) यांच्या वतीने येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी एका भव्य 'विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू संस्कृतीचे जतन आणि समाजातील एकजूट वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित हा सोहळा उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील सेक्टर ५०, देवकृपा सोसायटी समोर  संध्याकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
 
​या संमेलनासाठी कोकण प्रांताचे धर्म जागरण प्रमुख  राजेश कुंटे हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तसेच, या सोहळ्याला श्री श्री १००८ महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज (वहाळ) आणि  रमेश महाराज यादव (उरण) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.​या विराट संमेलनाची सुरुवात एका भव्य दिंडी सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येईल. मान्यवरांच्या मार्गदर्शनासह हिंदू धर्मातील विचारांचे आदान-प्रदान हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.​द्रोणागिरी आणि उरण परिसरातील समस्त हिंदू बांधवांनी या मंगलमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, द्रोणागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती