पुणे : अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासानिमित्त पुण्यातील परंपरा जपणाऱ्या बोधनी प्रतिष्ठान कडून ३३ दांपत्यांचा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूजा,भोजनासह यथोचित आयोजन करण्यात आले आहे.रविवार,दि.१७ मे २०२६ रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत हा पारंपरिक कार्यक्रम अश्वमेध मंगल कार्यालय ,कर्वे रस्ता येथे होणार आहे.
बोधनी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष शिरीष बोधनी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.'अधिक मासात जावयाला भोजन आणि भेटवस्तू,दान देण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यात अनोखी भर टाकण्यासाठी समाजात उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या दांपत्यांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा घाट घातला आहे',असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. या दांपत्यांना दीपदान देखील करण्यात येणार आहे.
या गौरव कार्यक्रमाला प्रा. विकास मठकरी,नगरसेविका मंजुषा खर्डेकर,अभिनेते राहुल सोलापूरकर,किशोर सरपोतदार,अरविंद पटवर्धन, दीपक बोधनी,डॉ.पराग कश्यप आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.