सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 विश्लेषण

पुणे शहरातील CCTV यंत्रणेचा महापौरांकडून आढावा महिलांच्या सुरक्षेसाठी ‘AI Enabled’ कॅमेरे बसविण्याचा निर्णय

गजानन मेनकुदळे    14-05-2026 16:36:11

पुणे : शहरातील नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज महापौर निवासस्थानी शहरातील CCTV कॅमेऱ्यांच्या कामकाजाची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील विद्यमान CCTV यंत्रणेची स्थिती, बंद असलेले कॅमेरे, देखभाल व्यवस्था तसेच भविष्यातील सुरक्षा उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान महापौर नागपुरे यांनी प्रशासनाला शहरातील सर्व विद्यमान CCTV कॅमेरे १०० टक्के कार्यान्वित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेले कॅमेरे तातडीने दुरुस्त करून सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

महिलांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पुणे शहरात लवकरच अत्याधुनिक ‘AI Enabled’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या नव्या तंत्रज्ञानामुळे संशयास्पद हालचाली ओळखणे, गुन्हेगारी घटनांवर त्वरित नजर ठेवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे शक्य होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, “पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. विशेषतः महिलांना शहरात अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार आहे.”

या बैठकीला महानगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागाचे प्रतिनिधी तसेच संबंधित तांत्रिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात शहरातील प्रमुख चौक, शैक्षणिक परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि संवेदनशील भागांमध्ये AI आधारित CCTV प्रणाली उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

 


 Give Feedback



 जाहिराती