सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

गंभीर, जटिल समस्या आणि बिग बॉसचे ढोबळ चॅलेंज! आर्थिक संकटावर बालिश इव्हेंट करणे हे उत्तर आहे का? - मुकुंद किर्दत

डिजिटल पुणे    14-05-2026 16:44:36

पुणे : साधारण फेब्रुवारी 26 अखेर अमेरिका इराण युद्धाला सुरुवात झाली असे म्हणता येऊ शकते. आता त्याला अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे.प्रत्यक्षामध्ये बिग बॉस पंतप्रधान मोदी यांनी युद्धामुळे तेल तुटवडा असल्याचे सांगितले परंतु ज्या सूचना केल्या आहेत त्यावरून भारत मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला आहे असे दिसते. 

पेट्रोल डिझेल वापर कमी करा, इलेक्ट्रिकल व्हेईकल वापरा सार्वजनिक वाहतूक वापरा.. या बाबी एकमेकांशी संबंधित आहेत. यावर तात्पुरती उत्तरे आहेत का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटरसायकल वरून येणे किंवा इतर कोणी मंत्र्याने नवीन इलेक्ट्रिकल गाडी विकत घेणे हे या प्रश्नाचे गांभीर्य सरकारलाच नसल्याचे दर्शवते. महिन्यापूर्वी सर्व आलबेल आहे असे सांगणारे फडणवीस स्वतःच म्हणत आहेत की मोदींचे आवाहन हसण्यावरी नेऊ नका. 

रासायनिक खतांच्या वापरात बदल, माल वाहतुकीसाठी रेल्वे, मेट्रो वापर,परकीय चलन बचत हे सर्वच दीर्घकालीन धोरण, योजना आणि अंमलबजावणी यामधून साध्य होऊ  शकते.ऑनलाइन शाळा किंवा वर्क फ्रॉम होम तसेच सोन्याचा वापर कमी करणे, परदेश प्रवास कमी करणे एक तात्पुरते व तत्कालीन उपाय होऊ शकतात. त्यातील ऑनलाइन शाळा सारख्या पर्यायाने आपल्याला अपयशच दिलेले आहे. 

मोदी सरकार आणि युती सरकार हे या विषयांवर गंभीर नाही असा मेसेज लोकांमध्ये पोहोचतो आहे. शेतकरी आणि दुर्बल घटकांना यापूर्वीच अनेक फटके बसलेले आहेत आता मध्यमवर्गीयांना त्याचा फटका बसेल असे दिसते आहे. नेमका तोच बीजेपीचा खंदा बोलका पाठीराखा आहे. आंतरराष्ट्रीय आघाडीवर अपयश, मोठे आर्थिक संकट यामुळे त्याची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व इव्हेंट चालू आहे का असा प्रश्न यामधून पडतो आहे.

 

मुकुंद किर्दत, प्रवक्ता, आम आदमी पार्टी महाराष्ट्र


 Give Feedback



 जाहिराती