सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

घरफोडी व दुचाकी चोरी प्रकरणी सराईत आरोपी जेरबंद; नांदेडसिटी पोलिसांची कारवाई, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    14-05-2026 18:11:04

पुणे : नांदेडसिटी पोलिसांनी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दुचाकीसह तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड गाव परिसरात राहणारे किशोर दत्तात्रेय चित्रे यांच्या घरातून २.९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. तसेच कैलास वसंत लायगुडे यांची ‘स्कुटी पेप’ ही दुचाकी देखील अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना तपास पथकातील पोलीस कर्मचारी निलेश खांबे, स्वप्नील मगर आणि प्रतिक उर्फ बंटी मोरे यांना बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नांदेडफाटा परिसरातील सावली प्रेस्टीज सोसायटीमध्ये राहणाऱ्या आकाश आप्पा चव्हाण (वय २८) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने घरफोडी आणि दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे मंगळसूत्र आणि दुचाकी असा एकूण ४.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३०३ (२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, उपनिरीक्षक प्रसाद जोशी आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.


 Give Feedback



 जाहिराती