सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

पुणे महापालिकेच्या विविध विभागांचा सविस्तर आढावा; नागरिकाभिमुख सेवांवर भर

डिजिटल पुणे    15-05-2026 14:48:06

पुणे : पुणेकरांना अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत शहरातील महत्त्वाच्या सेवांबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, जलसंधारण, सुरक्षा व्यवस्था, अतिक्रमण नियंत्रण तसेच प्राणी उपचार सुविधा यांसह शहरातील सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यावर विशेष भर देण्यात आला. सर्व प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या आढाव्यातून अधोरेखित झाले.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 15-05-2026 16:13:30

सीटीजन चार्टर ची अंमलबजावणी होत नाही न्यू 1250 भवानीपेठेत बाझार पेठेत कायम स्वरूपी रथ रस्त्यात लावून वाहतूकीस अडथला होत आहे तक्रार करून ही भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय मार्फत दखल घेतली जात नाही तसेच पिपरीचौक नानापेठ ते अशोक चौक ते बूरडीपूल चौकात ओवर हेडेड केबल चे जाले असून विदूरूपीकरण झाले आहे ठीक ठीकाणी वायरी लोंबकलत आहे पूढे पालखी आल्यावर पूण्याची शोभा दिसेल तसेच गणेशपेठ अलपना टकीज रस्त्यावर मासे विक्री बेकायदेशीर चालू आहे नागझरीवर स्लेब टाकून तिथे ही उघड्यावर मासे विक्री मूले वाहतूक तूंबते बाहेर मासे विक्री मूले आतील व्यापारी बाहेर येण्याची शक्यता आहे अल्पना टाकीज शेजारी नागझरी वरील जालीवर मासे बाझार आत चालू आहेचे बोर्ड शोभेसाठी आहे का? नानापेठ पोलीस चौकीतील केमेरे असून पोलीस ही कारवाई करत नाही वारकरी भवन कारवाई सोबतच अल्पना टाकीज समोर नाल्यावरील स्लेब काढून टाकावा

Digital Pune
हरकचंद देवीचंद जैन
 15-05-2026 16:15:58

तक्रारीची दखल घेउन प्रशासण जागे असल्याची प्रचीती द्यावी

 Give Feedback



 जाहिराती