सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

कात्रज तलाव येथे शिवशंभू प्रतिष्ठाणतर्फे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

गजानन मेनकुदळे    15-05-2026 16:00:19

पुणे : कात्रज तलाव येथे शिवशंभू प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या भव्य सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने कात्रज परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमस्थळी आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली होती. भक्तीपर गाण्यांनी आणि जयघोषांनी परिसर भारावून गेला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन करत त्यांच्या पराक्रमाचे स्मरण केले.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. काटेकोर नियोजन, समर्पित कार्यपद्धती आणि सर्वांच्या एकजुटीमुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मा. नगरसेवक सुरेशभाऊ कदम, नगरसेविका प्रतिभाताई रोहिदास (बाप्पू) चोरघे, नगरसेवक प्रतिक कदम, प्रभाकर (बाबा) कदम, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष महेश कदम, शिवम कदम, सोहम कदम, अखिलभाऊ नायर, भाग्यजीत जाधव पाटील, स्वीकृत नगरसेवक तुषार कदम, गणेश निगडे, गणेश थोरात, रमेश पवार, नवनाथ पवार आणि किरण अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.शिवशंभू प्रतिष्ठाणच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती