पुणे : पुण्यातील मुंढवा परिसरातील अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ क्लब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. क्लबमध्ये तरुण-तरुणींकडून अश्लील चाळे सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे पुण्यातील पब संस्कृती पुन्हा चर्चेत आली आहे.शिल्पा शेट्टी यांच्या मालकीशी संबंधित असलेल्या पुण्यातील मुंढवा परिसरातील ‘बॅस्टियन’ क्लब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्लबमधील काही तरुण-तरुणींच्या कथित अशोभनीय वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या आवाजातील संगीत आणि गर्दीच्या वातावरणात काही युवक-युवती सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या लोकांसमोर हा प्रकार सुरू असल्याचे व्हिडिओत दिसून येत असल्याने पुण्यातील नाईटलाइफ आणि पब संस्कृती पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे.
मुंढवा परिसरातील हा क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता या नव्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अशा प्रकारांवर पोलिस आणि प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि नेमका प्रकार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.