सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 क्राईम

प्रवासी घेण्याच्या वादातून थरारक घटना; नवले ब्रिजवर रिक्षाचालकाला मारहाण करून पुलावरून फेकल्याचा आरोप

डिजिटल पुणे    19-05-2026 11:56:56

पुणे : पुण्यातील नवले ब्रिज परिसरात प्रवासी घेण्याच्या कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन रिक्षाचालकांनी मिळून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करत पुलावरून खाली फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमी रिक्षाचालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात प्रवासी उचलण्यावरून काही रिक्षाचालकांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि संबंधितांनी सुरज माणिक काळे यांना रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांसह कठीण वस्तूंनीही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना पुलावरून खाली ढकलल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत सुरज काळे यांना तातडीने भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काही जण एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नवले ब्रिज परिसरात प्रवासी भरण्यावरून रिक्षाचालकांमध्ये वारंवार वाद होत असतात. प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेमुळे अनेकदा किरकोळ भांडणे होतात. मात्र यावेळी वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वाहतूक व्यवस्थापन, रिक्षाचालकांमधील गटबाजी आणि पोलिसांच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


 Give Feedback



 जाहिराती