सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

भारती विद्यापीठात राष्ट्रीय ‘बीव्हीटेकफ्युजन–२०२६’ उत्साहात;विविध राज्यांमधील ११६ प्रकल्प गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    22-05-2026 11:42:27

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित तांत्रिक स्पर्धा ‘बीव्हीटेकफ्युजन–२०२६’ यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार, आंतरशाखीय शिक्षण,संशोधनवृत्ती आणि उद्योग–शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा दि.२० मे २०२६ रोजी  झाlली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद,उपप्राचार्य डॉ. एस.एम.जाधव, डॉ.एस.एस.चव्हाण, डॉ.के.बी.सुतार, डॉ.डी.एम.ढाणे तसेच विभागप्रमुख,प्राध्यापक समन्वयक,परीक्षक,उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी उपस्थित होते. यावेळी शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल डॉ.पतंगराव कदम यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. प्रा.प्रियांका गुरव यांनी आभार मानले.

या स्पर्धेला देशातील विविध राज्यांमधील अभियांत्रिकी शाखांतील सुमारे ३७५ विद्यार्थ्यांच्या ११६ प्रकल्प गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता,रोबोटिक्स आणि ऑटोमेशन,अक्षय ऊर्जा प्रणाली,स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर,पर्यावरण अभियांत्रिकी, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), शाश्वत तंत्रज्ञान आणि इंटेलिजंट सिस्टिम्स यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तांत्रिक उपाय सादर केले. या प्रकल्पांमधून सर्जनशीलता, तांत्रिक उत्कृष्टता, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि सामाजिक परिणामकारकता अधोरेखित झाली.हा कार्यक्रम भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि सततच्या प्रोत्साहनाखाली तसेच कुलपती प्रा.डॉ.शिवाजीराव कदम आणि कुलगुरू प्रा.डॉ. विवेक सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

‘बीव्हीटेकफ्युजन–२०२६’चे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (एसडीजी) सुसंगत असलेली ‘पीपल अँड सोसायटी’, ‘प्लॅनेट अँड क्लायमेट अॅक्शन’ आणि ‘इंडस्ट्री अँड बिल्ट एन्व्हायर्नमेंट’ ही संकल्पना. या उपक्रमामुळे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत होण्यास तसेच भावी अभियंत्यांना अनुभवाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत झाली.प्रकल्पांचे परीक्षण नावीन्य, मौलिकता, तांत्रिक सखोलता, प्रत्यक्ष उपयुक्तता, सादरीकरण कौशल्य, संघभावना आणि सामाजिक उपयुक्तता या विविध निकषांवर करण्यात आले.

‘बीव्हीटेकफ्युजन–२०२६’ची संकल्पना आणि उद्दिष्टे डॉ.के.बी.सुतार यांनी मांडली.त्यांनी भावी अभियंत्यांसाठी नवकल्पना, व्यावहारिक शिक्षण,उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे तांत्रिक नियम आणि कार्यपद्धती डॉ.डी.एम.ढाणे  यांनी स्पष्ट केली.


 Give Feedback



 जाहिराती