सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा संपन्न

डिजिटल पुणे    22-05-2026 12:18:04

पुणे : "समर्पण, समन्वय, सातत्य" या त्रिसूत्रीने प्रेरित "श्री सेवा समिती, पुणे" च्या वतीने "हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती" दिनाचे औचित्य साधून "श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा" चे आयोजन करण्यात आले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्याकरीता आपले बहुमूल्य रक्त कर्मी आणले. शंभूराजेंच्या याच ज्वलंत प्रेरणेने समाजातील गरजवंत रुग्णांप्रती असलेल्या काळजीपोटी पुण्यातील नामांकित जहांगीर हॉस्पिटल मधील रक्तपेढीत समितीचे कित्येक सदस्य तसेच हितचिंतकांनी स्वेच्छेने रक्तसंकलन करून सामाजिक सहकार्याचा निर्मळ संदेश सर्वदूर पोचविण्यास बहुमूल्य सेवा अर्पण केली.

वैद्यकीय क्षेत्रात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने मध्यंतरी अनेक वृत्तसमूहांनी सर्व नागरिक आणि सामाजिक संस्थांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या बहुमूल्य रक्ताची एक बॅग स्वराज्यासाठी स्वयंस्फूर्तीने अर्पण करून रक्तदाते सामाजिक सहकार्याचा निर्मळ संदेश सर्वदूर पोचविण्यास सेवार्थ झाले. याचे रक्तपेढीतील सर्व वैद्यकीय कर्मचारी वृंदाने मनापासून कौतुक केले. 

रक्तदान केलेल्या प्रत्येक सदस्यास रक्तपेढी आणि समितीच्या वतीने गौरविण्यात आले. तसेच अतिशय काळजीपूर्वक रक्त संकलित करून घेतल्याने जहांगीर हॉस्पिटल रक्तपेढीतील कर्मचारी वृंदाचा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गेली कित्येक वर्षांचे सातत्य टिकवून ही रक्तसंकलन मोहीम पु:नश्च एकदा यशस्वी करून दाखविल्याबद्दल रक्तपेढीच्या वतीनेही समितीचा विशेष असा सत्कार केला गेला.अशाच प्रकारचे उपक्रम भविष्यात राबवून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत समिती सदस्यांनी एकमेकांप्रती आभार प्रदर्शित केले.

 


 Give Feedback



 जाहिराती