सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
  • यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
  • धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
  • ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; 9 दिवसांत 39 कोटींचा टप्पा पार, अनेक सुपरहिट चित्रपटांना टाकलं मागे
 शहर

जनगणना कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण म्हणजे शासन व्यवस्थेवर हल्ला – आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा : आम आदमी पार्टी

डिजिटल पुणे    29-05-2026 17:32:44

पुणे : जनगणना करण्यासाठी अधिकृत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेली मारहाण ही केवळ एका व्यक्तीवरील हिंसा नसून संपूर्ण शासन व्यवस्थेवर केलेला भ्याड हल्ला आहे. कायद्याचा धाक संपला आहे का? असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारत आहेत.

देशाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी घराघरात जाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे हा गंभीर आणि अक्षम्य गुन्हा आहे. अशा प्रवृत्तींना राजकीय किंवा स्थानिक दबावाखाली संरक्षण मिळत असेल तर ते आणखी धोकादायक आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने संबंधित आरोपींवर कठोर कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.जर शासकीय कर्मचारीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? प्रशासनाने या घटनेकडे हलक्यात पाहू नये. दोषींना त्वरित अटक झाली पाहिजे


 Give Feedback



 जाहिराती