सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 DIGITAL PUNE NEWS

अण्णासाहेब मगर मालविद्यालयात 'रिसर्च कॉम्पेन्डिअम' या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन

डिजिटल पुणे    01-06-2026 11:15:06

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्या हस्ते 'रिसर्च कॉम्पेन्डिअम' या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. 

या संग्रहात महाविद्यालयातील संशोधक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २०२५ या वर्षांत विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन लेखांचे ( Research Paper) संकलन या मध्ये केले आहे.  महाविद्यालयातील आयक्यूएसी विभागाने हे संकलन केले आहे.  या संकलनाचे कार्य डॉ. सुनिता दानाई यांनी केले आहे. या संकलित आवृत्तीमुळे संशोधकांना एकाच पुस्तकात सर्व लेख वाचायला मिळणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. 

याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम. जी. ताकवले, संस्थेचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव आत्माराम जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक सुरेश घुले, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. लतेश निकम, डॉ. राहुल नरंगळकर, डॉ. सुजाता टापरे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ, दत्तात्रय बेसके, वैशाली कोरडे, विद्या खराडे आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती