सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 शहर

पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीने विजयाचा विश्वास व्यक्त केला

डिजिटल पुणे    03-06-2026 11:19:54

पुणे : पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, उपमहापौर परशुराम वाडेकर, जय पवार यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना महायुतीच्या नेत्यांनी विकास, स्थैर्य आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या बळावर विक्रम काकडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून त्यांना भक्कम पाठिंबा मिळेल, असेही नेत्यांनी सांगितले. पुणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीची विजयी वाटचाल सुरू झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती