सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 क्राईम

पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे नैराश्य; व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करून पतीची आत्महत्या

डिजिटल पुणे    03-06-2026 13:06:03

सोलापूर : सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीसाठी भावनिक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्यानंतर एका 38 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी जाकीर पटेल आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नीच्या नावाने सुमारे सहा मिनिटांचा व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी समोर आणला.

कुटुंबीयांच्या आरोपानुसार, जाकीर यांच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत कथित विवाहबाह्य संबंध होते. याच विषयावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. तसेच संबंधित व्यक्तीकडून झालेल्या अपमानामुळे जाकीर मानसिक तणावात होते, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

व्हिडिओमध्ये जाकीर पटेल भावनिक अवस्थेत पत्नीबद्दल बोलताना दिसत असून, वारंवार समजावूनही परिस्थितीत बदल झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती