सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणे दारू कांडानंतर उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये! ठाण्याच्या खाड्यांमध्ये 1 कोटींची गावठी दारू नष्ट, पोकलेनने हातभट्ट्या उद्ध्वस्त
  • हिंजवडीतील ‘थिंकटेक’ फसवणूक प्रकरणात मालक अटकेत; 700 आयटी कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक उघड
 जिल्हा

ॲग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    03-06-2026 14:44:01

मुंबई : महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल. ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरु करण्यासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपोर्टचे कार्यकारी संचालक जीत अदानी, मुख्य अधिकारी बी व्ही.सी. के. शर्मा, एस. टी.सी.एल. संचालक अर्चना सिंग,  वाहतूक संस्थेचे रुपेश धुमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ॲग्रीगेटर टॅक्सीमुळे चालकांच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि नागरिकांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवेच्या माध्यमातून छोट्या शहरापर्यंत सहज पोहचण्यास मदत होईल.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यात यापूर्वी ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर टॅक्सी सेवा खासगी कंपन्यांकडून दिली जात आहे. सध्या या ॲग्रिगेटर आधारित टॅक्सी सेवांमध्ये चालकांना सामाजिक सुरक्षेच्या अभावासारख्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच नागरिक व प्रवाशांनादेखील विविध अडचणी व समस्या येतात. या पार्श्वभूमीवर चालकांना कामगारांमधून मालकांमध्ये रूपांतरित करण्याचे आणि त्यांना सहकाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय यामागे आहे. राज्य परिवहन महामंडळ देखील ‘छावा’ या नावाने ॲप विकसित करीत आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्थेंच्या माध्यमातून सुरू करावयाच्या सेवेबाबत माहिती दिली.सहकार भारत टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेडचे कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे भारत टॅक्सी सेवेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मुंबई येथे भारत टॅक्सीची सुरुवात केली जाणार असून या पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेदेखील ही सेवा पोहोचवली जाईल.

भारत टॅक्सी सेवा

देशातील सुमारे २ कोटी व्यावसायिक चालकांचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार ‘सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेड’ (भारत टॅक्सी) ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात  पुढे आली आहे.

या उपक्रमामुळे चालकांना केवळ रोजगार नव्हे, तर मालकी हक्क, सामाजिक सुरक्षा आणि न्याय्य उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे.‘भारत टॅक्सी’ च्या माध्यमातून चालकांना कुटुंब, आरोग्य व अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कमी व्याजदराने (सुमारे ९.५ टक्के) कर्ज उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय, आयुष्मान भारत योजनेचा लाभही चालक व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती