पुणे : निसर्गसेवा संस्था' यांच्या वतीने वारजे वन उद्यान येथे जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.बीएसएनएल टेलिफोन कमिटी(भारत सरकार) चे सदस्य सचिन गजरमल निसर्ग सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कडू, उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सचिव सूर्यभान कडलक, कोषाध्यक्ष रामभाऊ मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. निमंत्रक राहुल जोरी ,पोलीस अधिकारी लोणारे ,सदस्य दत्ताभाऊ कडू ,अनंतराव जाधव, गंगाराम मिरची, शिवकुमार होनराव, अमर कांबळे ,रमेश पाल ,पराग मारवाडी यांनीही सहभाग घेतला.
पर्यावरण संवर्धन आणि हरित पुणे घडवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात स्वयंसेवक,नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.या उपक्रमात विविध प्रकारची स्थानिक आणि पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही करण्यात आली.सर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला.