सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : BCCI चे तीन तगडे निर्णय, थेट कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव टी-20 संघातून बाहेर, वैभव सूर्यवंशीची निवड
  • अभिजीत दीपके भारतात दाखल; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाने संभाजीनगरमधील निवासस्थान तात्पुरते सोडले
  • कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनाला पोलिसांची परवानगी; अभिजीत दिपके भारतात दाखल होताच मोठे यश
 क्राईम

पुण्यात सायबर गुन्ह्यांचा कहर! ऑनलाइन गुंतवणूक, क्रेडिट कार्ड अपडेट आणि नफ्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

डिजीटल पुणे    06-06-2026 15:00:48

पुणे : पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ऑनलाइन माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या दैनंदिन प्रेस नोटनुसार विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ऑनलाइन गुंतवणूक, क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स, शेअर ट्रेडिंग आणि वस्तू खरेदी-विक्रीच्या आमिषाने अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून संपर्क साधून जास्त परताव्याचे आश्वासन दिले. काही प्रकरणांमध्ये क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून संवेदनशील माहिती घेत आर्थिक व्यवहार करण्यात आले. तसेच ऑनलाइन गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्याचेही तक्रारींमधून उघड झाले आहे.

याशिवाय, ऑनलाइन खरेदी-विक्री, शेअर ट्रेडिंग आणि विविध आर्थिक योजनांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याची प्रकरणेही नोंदविण्यात आली आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पुणे पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंक, कॉल, मेसेज किंवा गुंतवणुकीच्या ऑफर्सवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आर्थिक माहिती किंवा ओटीपी शेअर करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती अथवा संस्थेची खातरजमा करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती