सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

नरेंद्र मोदींच्या तपपूर्तीनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनचा सेवा सप्ताह; सेवाकार्यातून समाधान आणि मनःशांती लाभते : ना. चंद्रकांतदादा पाटील

डिजीटल पुणे    10-06-2026 14:55:45

पुणे : सेवाकार्यातून समाधान आणि मनःशांती लाभते आणि म्हणूनच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ,हारतुरे, शाल श्रीफळ,भेटवस्तू,मिठाई केक इ न देता कार्यकर्त्यांनी सेवाकार्य करावे किंवा मी करत असलेल्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावावा असे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. नरेंद्रभाई मोदी यांची पंतप्रधान पदाची तपपूर्ती आणि माझा वाढदिवस हा एकाच दिवशी असल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणित होत असल्याचे मत ही चंद्रकांतदादांनी व्यक्त केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपपूर्ती आणि ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा केला जात आहे या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. कल्याणी खर्डेकर,निसर्गछाया च्या संचालिका सौ. अमृता देवगावकर, मंदार देवगावकर,विन विन बाईट्स एल एल पी व विंग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक मयूर पवार,राम मुंडे, प्रदीप काकडे,प्रेम खाडे,गणेश खाडे,अंकुश वाघमारे,सागर पवार,दिलीप साळुंखे,सौरभ पवार, अभिषेक आटोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

क्रिएटिव्ह फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून फाउंडेशन च्या वतीने विविध सेवाभावी संस्थांना उपयुक्त साहित्याची मदत करण्यात येते असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

यालाच अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांची पंतप्रधान पदाची तपपूर्ती आणि ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फाउंडेशन ने सेवा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले व आज निसर्गछाया ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेस वॉटर डिस्पेन्सर व स्पीकर सेट भेट देण्यात आल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकरी ते ग्राहक असे बाजार भरविणारे आणि कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, विपणन व निर्यात यात प्रामुख्याने कार्य करणारे मयूर पवार व त्यांच्या टीम चा मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना टूल बॉक्स सह सोलर लाईट सेट भेट देण्यात आले.

माझ्याच प्रभागात नव्हे तर महाराष्ट्रात दर आठवड्यात विविध ठिकाणी शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम समर्थपणे आणि सातत्याने राबविण्यात मयूर पवार आणि टीम चा हातखंडा असून त्यांच्या कार्याबद्दल नुकत्याच पार पडलेल्या पुणे हॅकेथॉन मध्ये त्यांना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 लाखाचे बक्षीस मिळाले याचा अभिमान वाटतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

विन विन बाईट्स एलएलपी ने कमी तेलयुक्त, अधिक पौष्टिक आणि चविष्ट तळलेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अभिनव व्हॅक्यूम फ्रायिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. या प्रणालीमध्ये व्हॅक्यूम चेंबरमध्येच रिअल-टाइम तेल निरीक्षण आणि सेंट्रिफ्यूगल डी-ऑइलिंग यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रक्रिया कार्यक्षमता वाढते. हे तंत्रज्ञान विशेषतः मिलेट्स आणि भाजीपाला आधारित उत्पादनांना मूल्यवर्धन करण्यास मदत करते. तसेच शेतकरी, महिला उद्योजक आणि ग्रामीण उत्पादकांसाठी अधिक बाजारपेठीय संधी निर्माण करण्याचे काम करते. या नवकल्पनेद्वारे शाश्वत अन्नप्रक्रिया, निरोगी स्नॅक्स आणि कृषीआधारित उद्योजकतेला चालना देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मयूर पवार यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती