सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
  • धक्कादायक! तळेगाव MIDC मध्ये गॅस गळतीमुळं दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण
  • काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
  • महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
 जिल्हा

सांगली पेठ येथे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करणार – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

डिजिटल पुणे    10-06-2026 16:15:06

मुंबई  : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे होणारे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे उर्वरीत काम गतीने करावे. या महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून  याबाबत कार्यवाही करावी अशा  सूचना  कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.मंत्रालयातील दालन  येथे पेठ (सांगली) येथील शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू   करणे या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत कृषि मंत्री दतात्रय भरणे बोलत होते यावेळी या बैठकीला आमदार सदाभाऊ खोत, सचिव परिमल सिंह,उपसचिव प्रतिभा पाटील, कृषि शिक्षण व संशोधन परिषद, चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, अधिष्ठाते, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृषि मंत्री दतात्रय भरणे म्हणाले की, पेठ (सांगली) येथील शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाची मुख्य प्रशासकीय इमारत, विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतीगृह आणि ग्रंथालय इमारतीचे स्थापत्य व विद्युत कामे पूर्ण झाली आहेत. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर पदे भरणे याची कार्यवाही करण्यात यावी. अन्न रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न पॅकेजिंग यांसारख्या अत्याधुनिक प्रयोगशाळेसाठी आवश्यक त्या निधीची कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. आमदार सदाभाऊ खोत यांनी शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे उर्वरीत काम कृषि विभागाने तातडीने पूर्ण करून येथे पदभरती करून  हे महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी यावेळी केली.


 Give Feedback



 जाहिराती